जया (बोल) बच्चन
खोडसळपणा कसा करावा हे
जर शिकायचं असेल तर त्याचे धडे
बॉलीवुडचे शहंशाह अमिताभ बच्चन
यांच्या सौभाग्यवती,
सौंदर्यसम्राज्ञी ऐश्वर्या राय बच्चन
यांच्या सासु माँ आणि सुपुत्र अभिषेक
बच्चन यांच्या मातोश्री जया बच्चन
यांच्याकडून घ्यायला हवेत. यांना एवढी
विशेषणं लावण्याचं कारण त्यांनी फक्त
राज ठाकरेंनाच नाही तर महाराष्ट्राला
डिवचण्याचं पराक्रम केला आहे.
झालं असं
की काल जया आणि अमिताभपुत्र
अभिषेकच्या द्रोणा फिल्मच्या म्यूझिक
रिलीजचा कार्यक्रम होता. या
कार्यक्रमात जया बच्चन यांना स्टेजवर
बोलवण्यात आलं. आणि त्यांनी पाऊल
ठेवताच महाराष्ट्राविरोधी बडबड सुरु
केली. पण यात गोची झाली ती
प्रियंकाबाईंची. त्यांना काय बोलावं
हेच सुचेना. कारण मध्येचं जयाबाईचं
यूपी प्रेम ऊतू जात होतं.
"हम तो यूपी के
है, हिंदीमेंही बोलेंगे। महाराष्ट्र
के लोग हमे माफ कर दें"
बरं जयाबाईंना
कुणी विचारलं होतं का की सासु माँ
तुम्ही कुठल्या भाषेत बोलणार ? पण
माणसांना एखाद्या व्याधीनं पछाडलं की
तो चांगलं सर्व विसरून जातो. पण मराठी
माणूस जयाबाईंचा हा खोडकरपणा नक्कीच
विसरणार नाही. मनसे तर नाहीच
नाही.
जयाबाईंच्या या वक्तव्यावर मनसे
आणि शिवसेनेने माफी मागण्याची जोरदार
मागणी केली आहे
जयाबाईंचा हा वाचाळपणा
राज ठाकरेंना टोला असल्याचं काहींना
वाटतं. असेलही. पण जयाबाईंनी यात
महाराष्ट्र आणण्याचं काहीच कारण
नव्हतं. कारण सामान्य मराठी माणुस
मनानं उदार आहे. म्हणूनच तर शोलेतल्या
राधावर तो अजुनही फिदा आहे. ही एवढी समज
जया बहादूरी बच्चन ठेवतील का ?
My Other Videos